योग म्हणजे काय?
योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा या सर्वांना ईश्वराशी जोडणे होय. योग म्हणजे बुद्धी, मन, भावना आणि संकल्प यांचे नियमन होय. योग म्हणजे आत्म्याचे स्थिरत्व होय. योग म्हणजे मनुष्याचे त्याच्या आत्मशक्तीशी मिलन होय. ”शरीर माध्यम खलू द्यर्म साद्यनम्” ही संस्कृत उक्ती अतिशय महत्त्वाची आहे. कोणतंही सत्कार्य (खलू-द्यर्म) साद्यायचं झालं तर ठणठणीत शरीर असल्याशिवाय त्या कार्याची फलश्रुती समाद्यानकारक मिळणे द्वरापास्त आहे. मनाचे स्वास्थ्य शरीरावर अवलंबून आहे, तर उलट पक्षी मनासह शरीराचे तंत्र सुरळीत राहते.
योग हा संस्कृत भाषेतील ‘युज’ या शब्दापासून बनला आहे. ज्याचा अर्थ आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे असा होतो. योगा हा भारतात फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे. भारतीय ऋषी पतंजली यांनी लिहलेला ‘योग सूत्र’ नावाचा ग्रंथ जवळपास २००० वर्ष जुना आहे. हि आतापर्यंतची योगाबद्दल सर्वात जुनी लिखित नोंद आहे. या ग्रंथामध्ये योग तत्वज्ञानावर भर दिला आहे. भावना व मनावर नियंत्रण कसे ठेवावे व त्यामधून आपला अध्यात्मिक विकास कसा साधावा हा या ग्रंथामध्ये दिलेला मुख्य हेतू आहे. भारतातील सिंधू संस्कृतीतही योगाचा उल्लेख आहे. योगासनाचे प्रकार व त्याच्या आकृत्या यांची चित्रे सिंधू खोऱ्यातील गुफा, दगडांवर कोरलेली आढळतात.
आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे.
योगातून आपल्याला खालील गोष्टी सध्य करता येतात:
- शारीरिक स्वास्थ्य
- मानसिक आरोग्य
- सामाजिक आरोग्य
- आध्यात्मिक आरोग्य
- आत्मज्ञान
योगासनांचे मुख्य खाली प्रकार पडतात:
- राजयोग
- हठयोग
- लययोग
- ज्ञानयोग
- कर्मयोग
- भक्तियोग
काही महत्वाचे योगासनाचे प्रकार:
ध्यान: ध्यान करणे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. रोज काही मिनिटे आपण डोळे झाकून ध्यानाच्या स्थितीत बसल्यास शरीरामध्ये आणि मनामध्ये शक्तीचा संचार होतो. विशेषता सकाळच्यावेळी ध्यान केल्याने मन प्रसन्न आणि एका विशिष्ट दिशेने कार्यरत राहते. मन एकाग्र आणि शांत राहते. त्यामुळे आपला ताण तणाव नाहीसा होतो.
ध्यान
शलभासन: बराच व्यक्तींना पाठ आणि कमरेचा त्रास होत असतो विशेषतः महिलांना. गरोदर पणा नंतर सहसा सर्वच महिलांना कमरेचा आणि पाठीचा त्रास होतो. अशावेळी शलभासन हे आसन केल्याने हा त्रास कमी होण्यास मदत होतेे. या आसनामुळे पाठाचे आणि कंबर यांचे स्नायू बळकट होतात. शलभासन हे आसन नियमित केल्याने कमरेचा आणि पाठीचा त्रास कायमस्वरूपी नाहीसा होण्यास मदत होते.
शलभासन
नाडी शोधन प्राणायाम: आपल्या संपूर्ण शरीराची शुद्धी करायचे असेल तर नाडी शोधन प्राणायाम फायदेशीर ठरते. या प्राणायाम मध्ये दीर्घ श्वास घेऊन सोडायचा असतो. त्यामुळे आपल्या श्वासावर नियंत्रण राहते. त्यामुळे हा योगाचा प्रकार शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो.
नाडी शोधन प्राणायाम
भुजंगासन: प्रत्येक आसन हे आपल्या शरीरासाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारे फायदेशीर ठरते. छाती आणि शरीरातील मांसपेशी दूर करण्यासाठी व कंबरेतील तणाव दूर करण्यासाठी हे प्राणायाम फायदेशीर ठरते. मंरूदंड संबंधित आजारी व्यक्तींना हे व्यायाम केल्याने खूप फायदा होतो. महिलांना गर्भाशयातील रक्तभिसरण प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी भुजंगासन आसनाची खूप मदत होते.
भुजंगासन
अर्ध चक्रासन: ज्या व्यक्तींना व् मधुमेहा सारखा आजार असतो त्यांना अर्ध चक्रासन उपयुक्त ठरते. तसेच पोटातील चरबी पासून मुक्तता हवी असेल तर त्यावर अर्ध चक्रासन हा उत्कृष्ट उपाय आहे. हे आसन केवळ मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने करावे.
अर्ध चक्रासन
अर्धमत्स्येंद्रासन: हे आसन करताना प्रथम मंडी घालून बसावे नन्तर दावा पाय आत दुमडून डावे पाऊल बुडाखाली आणावे. उजवा पाय डाव्या मांडीवरून डावीकडे टेकवावा. व उजवे पाऊल जमिनीवर टेकलेले आणि उजवा गुडघा सरळ वर उचललेला असावा. डावा खांदा उजव्या गुडघ्याच्या बाहेर आणायचा आणि पाठ आणि कमरेतून उजवीकडे मागे फिरायचे. पाठ सरळ ठेवून डोळ्यांच्या रेषेत मागे बघायचे. असेच दुसर्या बाजूने करायचे.
अर्धमत्स्येंद्रासन
नौकासन: पाठ सरळ ठेवून, पाय सरळ पसरून आणि गुडघे जुळवून बसायचे आणि दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता एकमेकांना जुळवून पोटातून ४०° ते ४५° वर उचलायचे. हाताची बोटे पावलांच्या दिशेने धरायची.
नौकासन
सर्वांगासन: सोप्या पद्धतीने तुम्ही सर्वांगासनाचा सराव करू शकता. आराम करा आणि जमिनीवर किंवा पाठीवर चटईवर झोपा. तुमचे पाय हळू हळू वर करा, त्यांना 90° च्या कोनात आणा. आता नितंबवर करताना तुमचे पाय तुमच्या डोक्याच्या दिशेने आणा. तुमचे पाय, छाती आणि पोट एका सरळ रेषेत आणण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांना वर उचलत राहा. आपल्या तळहातांनी आपल्या कमरेला आधार द्या. तुमची हनुवटी तुमच्या छातीजवळ ठेवा. जोपर्यंत तुम्हाला आरामदायक वाटत असेल तोपर्यंत या स्थितीत राहा.
सर्वांगासन हे सर्वात प्रगत योग आसनांपैकी एक आहे, ज्याचा सराव तुमच्या शरीराला अनेक फायदे देतो. हे तुम्हाला संपूर्ण शरीर प्रशिक्षणात मदत करते. या आसनाचा दररोज सराव केल्यास तुमच्या शरीराची लवचिकता, ताकद आणि गतिशीलता वाढते. शरीर मजबूत आणि निरोगी बनवण्यासाठी सर्वांगासनाचा सराव खूप फायदेशीर आहे.
सर्वांगासन
हलासन: हलासन ही सर्वांगासनाची पुढची पायरी आहे. सर्वांगासन पूर्ण स्थितीत पोहोचल्यावर कंबर उचललेली ठेवून आणि पाय गुडघ्यात सरळ ठेवून पायांचे चवडे डोक्याच्या मागच्या बाजूला टेकवायचे. हलासन स्थिती सोडताना पाय गुडघ्यात वाकवून कंबरेच्या वर आणायचे आणि पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवत सावकाश संपूर्ण पाय टेकवायचे. (मानेचे दुखणे / सर्व्हायकल स्पाँडिलायटिस असणाऱ्यांनी हे आसन करू नये.)
हलासन
आकर्ण धनुरासन: दोन्ही पाय पुढे पसरून, डाव्या पायाचे पाऊल उजव्या मांडीवर ठेवायचे आणि डाव्या पायाचा अंगठा उजव्या हाताने कानाकडे ओढून, डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा… सुरुवातीला डाव्या पायाचा अंगठा उजव्या हाताने ओढायला जमत नसेल, तर उजव्या हाताने डावे पाऊल खालून आधार देऊन वर उचलायचे… असेच दुसर्या बाजूने करायचे. ह्या आसनामुळे मांड्या, हिप जॉइंट्स, जांघा ह्यांच्याशिवाय खांदे, पाठीचा कणा, पोटाचे स्नायू ह्यांची फ्लेक्सिबिलिटी वाढते, तसेच हे करण्याने पचनसंस्थेचे कार्य सुधारते.
आकर्ण धनुरासन
बद्धकोनासन: मांडी घालून सरळ बसायचे आणि दोन्ही तळपाय एकमेकांना टेकवायचे. हातांनी पावलांचा आधार घेऊन कंबर वर उचलायची आणि पाठ सरळ करायची. दोन्ही पावले जांघेकडे ओढून दोन्ही गुडघे बाहेरच्या बाजूने जमिनीकडे दाबायचे. नजर समोर. चांभार बसतो तशी ही स्थिती असल्याने ह्याला ‘कॉबलर स्ट्रेच’ किंवा फूलपाखराच्या पंखांप्रमाणे गुडघे बाहेर सोडलेले असल्याने ह्याला ‘बटरफ्लाय स्ट्रेच’ असेही म्हणतात. ह्या आसनामुळे मांडीचा आतला भाग, गुडघ्यांची आणि जांघांची लवचीकता वाढते. मांडी घालून बसायची क्षमता वाढल्याने, बसून करायची आसने चांगल्या प्रकारे करता येतात.
बद्धकोनासन
तर ही आहेत काही महत्वाची योगासने. अजूनही खूप प्रकार आहेत योगासनांचे. आता पाहूया योगासनांचे काय फायदे होतात ते.
- सर्व स्तरांवर तंदुरुस्ती
- स्नायूची लवचिकता सुधारते
- उत्तम पाचक प्रणाली प्रदान करते
- अंतर्गत अवयव मजबूत करते
- दम्याचा उपचार करते
- मधुमेह बरे करते
- हृदयाच्या समस्या दूर करण्यात मदत करते
- सामर्थ्य आणि सहनशक्तीला प्रोत्साहन देते
- एकाग्रता सुधारते
- मन आणि विचारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते
- चिंता, तणाव आणि नैराश्यावर मात करण्यासाठी मन शांत ठेवते
- ताण कमी करण्यास मदत करते
- रक्त परिसंचरण आणि स्नायू विश्रांतीत मदत करते
- वजन कमी करण्यास मदत होते
- दुखापतीपासून संरक्षण होते
योग काळाची गरज:
आजचे जीवन इतके धावपळीच्या आणि गतिमान झाले आहे त्यामुळे प्रत्येक जण आपल्या एक आणि मानसिक आरोग्य पासून वंचित राहतात. त्यामुळे शरीर अस्वस्थ होते. वेगवेगळ्या आजारांना आपण बळी पडतो. आपल्यातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला योग करणे हे गरजेचे आहे व योगासन हे सध्याच्या काळाची गरज आहे.
(महत्त्वाची सूचना – ही सर्व आसने शिकताना ट्रेनरच्या देखरेखीखाली आणि त्यांची मदत घेऊनच करावीत).