पुढच्या महिन्यात असणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल आणि पर्यावरण दिनानिमित्त कल्याण सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि बीके बिर्ला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमान ही सायकल रॅली होत आहे येत्या रविवारी 4 जून रोजी बिर्ला महाविद्यालयाच्या प्रांगणापासून ही सायकल रॅली प्रारंभ होणार आहे. (Organized cycle rally in Kalyan on the occasion of International Bicycle Day and Environment Day)
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेशचंद्र आणि कल्याण परिमंडळाचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सायकल रॅली संपन्न होणार असल्याची माहिती उपक्रमाचे नोडल अधिकारी प्रशांत भागवत यांनी दिली.
या उपक्रमात कल्याण सायकलिस्ट फाउंडेशन, डोंबिवली सायकलिस्ट ग्रुप, हिरकणी महिला सायकलिस्ट ग्रुप, पलावा सायकलिस्ट ग्रुप, टीम बाईक पोर्ट आदी सायकल ग्रुपचे अनेक सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. या सायकल रॅलीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासह निरोगी आयुष्याचा संदेशही दिला जाणार असल्याचे प्रशांत भागवत यांनी सांगितले.
त्यामुळे नागरिकांनी या सायकल रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Source @LNN