रक्तदानाला फार महत्व आहे. एखाद्याचे प्राण वाचण्यासाठी रक्त चढवावे लागते, अपघातात जखमींना उपचारासाठी, गरोदर स्त्री साठी तसेच इतर ऑपरेशनसाठी रुग्णांना रक्ताची गरज भासते. थॅलेसेमिया, ल्यूकेमिया, सिकलसेल या आजारातील व्यक्तींना वारंवार रक्त लागते. थॅलेसेमिया या आजारातील बालकांना दर २० दिवसांनी रक्त द्यावे लागते. त्यांच्या शरीरात रक्त निर्माण करण्याची प्रक्रिया जोपर्यंत कार्यक्षम होत नाही तोपर्यंत त्यांना कित्येक वर्षे वारंवार रक्त चढवावे लागते. म्हणूनच रक्तीदानाला जीवनदान म्हणतात. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची गरज भासते.
ए, बी, ओ या रक्तगटांचा शोध लावणारे, नोबेल पारितोषिक विजेते कार्ल लँडस्टीनर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत २००४ पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी १४ जूनला हा दिवस जगभरात जागतिक रक्तदाता दिन (World Blood Donor Day) साजरा होतो.
ह्या जागतिक रक्तदान दिनानिमित्त कल्याणात रक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेतील नामांकित जी प्लस हार्ट हॉस्पिटलच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला जाणार आहे. आज असलेल्या जागतिक रक्तदान शिबिराच्या निमित्ताने १४ जून ते २१ जूनपर्यंत हा सप्ताह असणार आहे. या उप्रकमात अधिकाधिक रक्तदात्यानी सहभागी होण्याचे आवाहन जी प्लस हार्ट हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.
जी प्लस हार्ट हॉस्पिटल,
राधा नगरच्या समोर, केंब्रिया शाळेजवळ, खडकपाडा, कल्याण – प
वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ६