रविवार, दिनांक २५ जून २०२३ रोजी ब्राह्मणसभा कार्यालय, डोंबिवली येथे मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटरच्या २२ व्या व मनोदय ट्रस्टच्या १५ व्या वर्षपूर्तीनिमित्ताने मनोदय ट्रस्ट व वेध अॅक्टिंग अकॅडमी सहनिर्मित व मानसचित्रं प्रस्तुत “एका बोटीचे प्रवासी” “एकमेका साह्य करू” व “औषध” या तीन लघुपटांचा शुभारंभ / प्रिमियर ज्येष्ठ मनोविकारतज्ञ व के. ई. एम. हॉस्पिटलच्या माजी अधिष्ठात्री डॉ. शुभांगी पारकर यांच्या सन्माननीय उपस्थितीत व प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात करण्यात आला.
त्यानंतर लघुपटातील मन आरोग्याशी तसेच फिल्म्सशी संबंधित अशी सुंदर चर्चा करण्यात आली, चर्चेत डॉ. शुभांगी पारकर, डॉ. अद्वैत पाध्ये, दिग्दर्शक निलय घैसास, कला दिग्दर्शक संकेत ओक, कलाकार सौरभ सोहोनी सहभागी झाले होते.
मनोविकारांना शरीराच्या विकारांप्रमाणेच स्वीकारले पाहिजे व औषधोपचारांशी मैत्री केली पाहिजे, मानसिक रूगणांनासुद्धा सुंदर जीवन जगण्याच हक्क आहे आणि त्यासाठी स्वमदत गट खूप उपयुक्त आहेत, तसेच हे लघुपट हाच संदेश प्रभावीपणे देत आहेत,असे प्रतिपादन डॉ. पारकर यांनी केले !!