स्वप्नगंधा रमेश करमरकर हिचा जन्म दि. २९ ऑगस्ट १९९२ रोजी झाला. तिच्या आई वडलांना संगीताची आवड होतीच, त्यामुळे साहजिकच संगीताच्या पोषक वातावरणामुळे तिच्यातही संगीताची आवड निर्माण झाली. तिच्या आई वडलांनी गायन-वादन-नृत्य या तीनही विषयांच्या वर्गात (क्लासमध्ये) तिचे नाव घातले. तिचा तबला वादनातील कल पाहून, वयाच्या आठव्या वर्षापासून, कल्याणचे श्री. कैलास जोशी यांच्याकडे तिचे तबला वादनाचे शास्त्रोक्त शिक्षण सुरू झाले. श्री. कैलास जोशी यांच्याकडे आठ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर, त्यांच्याच सांगण्यावरून, पंजाब घराण्याचे, पंडित योगेश समसी यांचे शिष्य श्री. स्वप्नील भिसे यांचेकडे गेल्या चौदा वर्षांपासून तिचे तबला वादनाचे शास्त्रोक्त शिक्षण सुरू आहे.
तबला-वादक होण्याचाच तिचा ध्यास असल्यामुळे, शालेय शिक्षण बारावी पर्यंत पूर्ण झाल्यावर, तिने मुंबई विद्यापिठाच्या चर्चगेट येथील संगीत विभागात, तबला विषयातील पदविका आणि पदवी परिक्षेसाठी प्रवेश घेतला. हे शिक्षण घेताना तिला पंडित विभव नागेशकर आणि श्री. प्रवीण करकरे यांचे मार्गदर्शन लाभले.
स्वप्नगंधा रमेश करमरकर हिने मिळवलेले कलेतील प्राविण्य:
- तबला विषयातील पदविका परीक्षा विशेष श्रेणीत उत्तीर्ण, मुंबई विद्यापीठ, मुंबई (Diploma in Tabla with Distinction)
- तबला विषयातील पदवी परीक्षा द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण, मुंबई विद्यापीठ, मुंबई (BA in Tabla – 2nd Class)
- तबला विषयातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमातील ‘ब्रिज कोर्स’ परीक्षा विशेष श्रेणीत उत्तीर्ण, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (Bridge Course in Tabla – Distinction)
- तबला विषयातील पदव्यूत्तर (एम.ए.) परीक्षा विशेष श्रेणीत उत्तीर्ण, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (MA in Tabla – Distinction)
- तबला विषयातील ‘संगीत विशारद’ (पदवी समकक्ष) परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण, गांधर्व महाविद्यालय, मिरज (Sangeet Visharad – Tabla – 1st Class)
- ‘सुगम संगीता’च्या तीन परीक्षा उत्तीर्ण
- ‘कत्थक नृत्या’च्या दोन परीक्षा उत्तीर्ण
विशेष प्राविण्य / पारितोषिक:
- ‘स्वर-साधना समिती मुंबई’, आयोजित ‘अखिल भारतीय नृत्य आणि संगीत स्पर्धे’त, पहिल्याच प्रयत्नात प्रथम पारितोषिक – रजत करंडक – सन २००९
- ‘स्वर-साधना समिती मुंबई’तर्फे, भारतातील पहिल्या महिला तबला वादक डॉ. अबान-इ-मिस्त्री यांच्या प्रथम स्मृति-दिनानिमित्त जाहीर झालेली, पहिली शिष्यवृत्ती – सन २०१४
- केंद्र सरकार, दिल्लीच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे देण्यात येणारी, तबला विषयातील ‘युवा कलाकार शिष्यवृत्ती’ – सन २०१४
मंचीय सादरीकरण:
स्वप्नगंधा करमरकर हिने २००९ पासून महाराष्ट्रातील, ‘स्वर-साधना समिती’, मुंबई, मुक्त व्यासपीठ परिवार, कल्याण, कणकवली, वात्सल्य ट्रस्ट, कांजूरमार्ग, राष्ट्र सेविका समिती, कल्याण, गुरुपौर्णिमा – डोंबिवली, बदलापूर, ग्रॅन्टरोड, तबला-ट्रायो जुगलबंदी, बदलापूर, दीपगंध दिवाळी पहाट, बदलापूर अशा विविध ठिकाणी एकल तबलावादन सादर केले आहे. तसेच तबला व्यतिरिक्त ढोलक, ढोलकी, संबळ, डफ, साईड-ऱ्हीदम, ऑक्टो-पॅड, ढोल, ताशा अशा विविध तालवाद्यांनी सांगीतिक कार्यक्रमात साथ-संगत केली आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिका, आयोजित संगीत कार्यक्रमात, स्वरचित ‘फ्यूजन’ सादर केले आहे.
परीक्षक नियुक्ती:
- ‘गांधर्व महाविद्यालय’, मिरज आयोजित परीक्षांसाठी परीक्षक म्हणून नियुक्ती.
- ‘भारत विकास परिषद’, डोंबिवली शाखा आयोजित, ‘राष्ट्रीय समूहगीत स्पर्धे’साठी परीक्षक म्हणून नियुक्ती.
लेखन:
- ‘तबल्याचा इतिहास, निर्मिती आणि विकास’ या विषयावर ‘संवाद’ त्रैमासिकात लेख.
स्वतंत्र संकल्पना / निर्मिती:
- कल्याणमधील पहिला महिला वाद्यवृंद, ‘स्वरस्नेह’ची स्थापना आणि पहिला कार्यक्रम – ८ मार्च २०१३.
- आत्तापर्यंत महाराष्ट्रात, कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई, माथेरान, यवतमाळ इत्यादी ठिकाणी अनेक कार्यक्रम सादर.
- याशिवाय ‘स्वरस्नेह सांगीतिक सृती’, कल्याण या नवीन नावाने ‘दादरा’, ‘सफर’, ‘पंचकन्या’ अशा विशिष्ट विषयांवरील विशेष कार्यक्रम सादर.
साधना – The Journey Towards Perfection ही तबला अभ्यासकांसाठी, वादकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी, विविध रागातील, तालातील आणि लयीतील ‘लेहऱ्यां’ची, YouTube Series. ५० लाखांहून अधिक लोकांनी व्हिडीओज पाहिले आहेत आणि या सिरीजचा लाभ घेत आहेत.
www.tabbhibola.com ही ‘तबल्याच्या शास्त्राची (Theory) वेबसाईट, गुरू, श्री. प्रविण करकरे यांच्या मार्गदर्शनाखाली लिहीली असून आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त प्रश्न-उत्तरं / लेख यावर प्रसिद्ध झाले आहेत. (लिहीले आहेत) तबला वादक, अभ्यासक, विद्यार्थी या सर्वांसाठी अगदी मोफत असे हे संकेत स्थळ असून, तबला-शास्त्राचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा, हे या website मागचं उद्दिष्ट…!!!