आषाढी एकादशीचे औचित्य साधून दि. २९ जून २०२३ रोजी दिशा सामाजिक सेवा संस्था, गोवेली येथे ईशा नेत्रालय, टिटवाळा यांच्या पुढाकाराने कॉम्प्यूटराइज्ड पद्धतीने व मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन डॉ. सचिन चव्हाण यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले होते.
दिशा सामाजिक सेवा संस्थेतील सर्व रुग्णांचे तसेच स्टाफचे डोळे तपासण्यात आले. आवश्यक त्यांना प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. काहींना पुढील उपचारासाठी मार्गदर्शनहि करण्यात आले. हि सर्व सेवा विनामुल्य दिल्यामुळे दिशा सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र कुऱ्हाडे यांनी ईशा नेत्रालय, टिटवाळा यांच्या सर्व डॉक्टरांचे व स्टाफचे आभार मानले.
दिशा सामाजिक सेवा संस्थेविषयी थोडक्यात:
दिशा सामाजिक सेवा संस्थाची स्थापना २०११ मध्ये झाली आणि धर्मादाय आयुक्त अधिनियम १८६०अंतर्गत २०१२ मध्ये नोंदणीकृत झाली. प्रथमतः: ही संस्था कल्याण येथे सुरू झाली. दिशा सामाजिक सेवा संस्थेची स्थापना श्री. राजेंद्र कुऱ्हाडे यांनी केली आहे. साधने आणि संधी उपलब्ध नसल्यामुळे असुरक्षिततेत जगणाऱ्या सामान्य माणसाचे जीवनमान सुधारणे ही दिशा सामाजिक सेवा संस्थाची संकल्पना होती. हे भारतातील मद्यविकार (दारू व्यसन – alcoholism), मादक पदार्थांचे सेवन (Drug abuse) आणि मानसिक विकारांवरील (mental disorders) उपचार सुविधा केंद्र आहे. हे भारतातील प्रथमच अनेक सायकोथेरपी कार्यक्रम असलेले एकमेव उपचार केंद्र आहे. श्री. राजेंद्र कुऱ्हाडे यांनी उपचार मॉडेल विकसित करण्यासाठी एक विकसित दृष्टीकोन अवलंबण्याचे ठरवले. ह्या व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनाधीन व्यक्तींसाठी विविध उपक्रम राबवले जातात. (Various activities are conducted for the addicts in this de-addiction center).