ग्वाल्हेर घराण्याचे वरिष्ठ गायक प. विकास गंगाधर तैलंग यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनानिमित्त, धरोहर संगीत सभा कल्याण तर्फे संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या प्रसंगी सुप्रसिद्ध खयाल गायिका विदुषी पल्लवी जोशी व प. भरत तैलंग ख्याल गायन सादर करणार आहे.
प. विकास तैलंग ग्वाल्हेर घराण्याचे वरिष्ठ गायक होते. त्यांचे ख्याल गायनचे शिक्षण वडील आणि ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक स्व. प. गंगाधर राव तैलंग आणि काका प. कृष्ण नारायण तैलंग ह्यांच्या कडे झाले. ते अल्मोड़ाच्या भातखंडे संगीत महाविद्यालय मधे संगीत प्रवक्ता ह्या पदावर कार्यरत होते.
विदुषी पल्लवी जोशी ह्यांचे संगीत शिक्षण त्यांचे आजोबा व सुप्रसिद्ध संगितज्ञ प. गजानन बुआ जोशी व काका प. मधुकर जोशी ह्यांच्या कडे झाले. पल्लवी जोशी ह्यांनी वडील श्री मनोहर जोशी व डॉ. सुचेता बिडकर ह्यांच्या कडे ही संगीताचे शिक्षण प्राप्त केले. त्यांना भारत सरकार तर्फे National Scholarship for Hindustani Classical Vocal young Artists देण्यात आली आहे. त्यांनी भारतात व परदेशातही ख्याल गायनाचे कार्यक्रम केले आहे. त्यांच्या सोबत तबल्यावर श्री. स्वप्नील भिसे व संवादिनी वर श्री. अनिरुद्ध गोसावी साथ करणार आहे.
प. भरत तैलंग हे प. विकास तैलंग ह्यांचे लहान भाऊ आहे. भरत तैलंग ह्यांचे संगीताचे शिक्षण त्यांचे वडील प. गंगाधर राव तैलंग व काका प. कृष्ण नारायण तैलंग ह्यांच्या कडे झाले. देश भरात त्यांचे संगीताचे कार्यक्रम झाले आहे. त्यांच्या बरोबर तबल्यावर श्री स्वप्नील भाटे व संवादिनी वर श्री अनिरुद्ध गोसावी संगत करणार आहे.
ठिकाण :- बालक मंदिर शाळा सभागृह, टिळक चौक, कल्याण – पश्चिम, ४२१३०१.
दिवस:- शनिवार,
दिनांक ९ सप्टेंबर २०२३
वेळ:- संध्याकाळी ५.३० ते ८.३०