१० ऑक्टोबर,जागतिक मनआरोग्य दिन! मनआरोग्याविषयी जागृती निर्माण करणे हा उद्देश.
मनाचे श्लोक पण लहानपणापासून आपल्या भावविश्वातील अमूल्य ठेवा!पण आपला भर जास्त करून पाठांतरावर! पण समर्थ रामदासांनी आपल्या मनासाठी किंबहुना आपल्या मनाच्या आरोग्याच्या दृष्टिने या श्लोकांधून बरेच काही सांगितले आहे.
तेच सर्व समजून घेऊ या रविवार ८ ऑक्टोबर रोजी संध्या ५.३० वाजता ब्राम्हण सभा हॉल,पहिला मजला,डोंबिवली पूर्व येथे, मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर व मनोदय ट्रस्ट आयोजित (जागतिक मनआरोग्यदिनानिमित्त) “श्लोक मनाचे,आरोग्य मनाचे”या आगळ्या कार्यक्रमात!!
मनाच्या श्लोकांचे आध्यात्मिक व मानसशास्त्रीय निरूपण करतील,सुप्रसिद्ध कॉर्पोरेट किर्तनकार व समर्थभक्त श्री. समीर लिमये व मानसोपचारतज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये!!
चला तर मग, मनाच्या श्लोकांमधून समर्थ जे सांगू इच्छितात ते जाणून घेऊ या व मनआरोग्याच्या दिंडीत सामील होऊ या!