येत्या मंगळवारी ३० जानेवारी २०२४ रोजी कल्याण पूर्व आणि पश्चिम भागांसह इतर परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत तसेच यांत्रिकी उपकरणांची दुरूस्तीच्या कामामुळे हा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.
येत्या मंगळवारी सकाळी ८.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण (ग्रामीण) विभागातील वडवली, शहाड,टिटवाळा गाव परिसर आणि डोंबिवली (पूर्व-पश्चिम) परिसरास होणार पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.
त्यामूळे या परिसरातील नागरीकांनी पाण्याचा साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केडीएमसी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.