श्रीगणेशाच्या पवित्र मंगलमय अस्तित्वाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हेमंत सुगंधी भांडार (HSB) प्रतिवर्षी अगरबत्ती उत्सवाचे आयोजन करत असते. आमच्या दर्जेदार सुगंधकृती, प्रथितयश उत्पादकांची नावाजलेली उत्पादने, पूजा साहित्य व आकर्षक भेटवस्तू हे या उत्सवाचे वैशिष्ट्य.
या प्रदर्शनात संपूर्ण भारतीय बनावटीची, हानीकारक रसायनमुक्त, अतिशय कमी धूर येणारी व विविध मनमोहक सुगंधाची व आकाराची अगरबत्ती उत्पादने आपल्या भेटीस घेऊन येत आहोत. सोबत उत्सव स्पेशल कॉम्बो पॅक, नैसर्गिक अर्कांपासून बनविलेले ८ विविध सुगंधांचे अष्टगंध, धूप काडी, उत्तम प्रतीची अत्तरे, गणेश पुजनासाठी लागणारी २१ पत्री इ. उपलब्ध आहेत.
विशेष आकर्षण: सुमारे पावणेदोन लाख अगरबत्ती काड्या वापरून बनवलेली गणेशाची सुंदर कलाकृती
आमच्या बहुविध दर्जेदार सुगंधी उत्पादनांचा दरवळ अनुभवण्यासाठी अगरबत्ती उत्सवाला नक्की भेट द्या. सोबत विवीध सवलतींचा लाभ मिळवा.
स्थळः आनंद बालभवन, रामनगर, डोंबिवली पूर्व.
दिनांकः 12 ते 17 सप्टेंबर 2023
वेळः स. ११ ते रा. ८.३०
वेबसाईट: www.hsbfragrances.com