
श्री. दिलरुबा गोसावी ह्यांचे घराणेच संगीताचे…आजोबा किर्तनकार होते. वडील विनायकराव पटवर्धन यांचे शिष्य. ते संगीत प्रवीण होते. कल्याणात दिनकर संगीत विद्यालयाचे प्राचार्य होते. दिलरुबा गोसावी ७-८ व्या वर्षापासूनच वडिलांकडे गाणे शिकू लागले. काही वर्षंनंतर त्यांचा आवाज फुटला. त्याच वेळी पेटीवर बोटं टाकली आणि ती त्यांना वाजवता येऊ लागली .
त्यांनी प्रथम वडीलांकडे प्राथमिक धडे घेतल्यावर काही वर्षांनी पं. मनोहर चिमोटे यांजकडे शिकण्यासाठी गेले. गोरेगाव येथे त्यांचे क्लास होते. त्यांचेकडे त्यांना सोलोचे अमूल्य शिक्षण मिळाले. विशेषतः संवादिनी वर त्यावेळी अल्प प्रमाणात वाजविली जाणारी आलापी कशी करावी, कशी फुलवावी व त्यातून राग कसा उभा करावा हे शिकण्यास मिळाले. तेव्हा नौकरीस नुकताच लागले असल्याने, वेळेचे गणित जमणे अवघड झाल्यामुळे त्याना पं. चिमोटे सरांकडे गोरेगावला ऑफिस संपल्यावर संध्याकाळी जाणे जमेना.
कल्याणच्या दिनकर संगीत विद्यालयात दिलरुबा गोसावी ह्यांनी २२ वर्षे संवादिनी वादनाचे शिक्षण दिले. तसेच अनंत वझे संगीत विद्यालयात २१ वर्षे संवादिनी वादनाचे शिक्षण दिले. त्यातून अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी पदवीधर झाल्या. त्यातील काहीजण अजूनही संवादिनी प्रसार व प्रचारात अग्रेसर आहेत. वानगीदाखल काहीजण म्हणजे, गौरी आठल्ये, प्रिती नित्सुरे, अनिरुध्द गोसावी, सुधांशु घारपुरे, दीपक घारपुरे, प्रमोद मराठे, पूनम वझे, उषा त्रिवेदी इ. यातील प्रमोद मराठे हे पुण्यातील गांधर्व महाविद्यालयात गेल्या कित्येक वर्षांपासून प्राचार्य पदी आहेत व गेली चार दशके प्रथितयश संवादिनी वादक आहेत.
सुरुवातीच्या काळात अनेक गायकांना (त्या वेळच्या) संवादिनी साथी केल्या. त्यात राम मराठे, दिनकर पणशीकर, नागेशबुवा खळीकर, पं जंगमबुवा, अलका देव इ. होते. त्यांना साथीपेक्षा सोलोमध्ये जास्त स्वारस्य होते. त्या दृष्टीने ते मेहेनत घ्यायचो.
दिलरुबा गोसावी स्वतः संगीत विशारद आहेत. त्यांनी ८० ते ९० या दशकात काही वाद्यवृंद, व काही विशिष्ट थीम घेऊन संमिश्र कार्यक्रमही केले होते. नौकरी शेवटपर्यंत सांभाळुन ही कला मला परमेश्वर कृपेने सांभाळता आली हे माझे परम भाग्यच होय, असे ते म्हणतात.
श्री. दिलरुबा गोसावी ह्याच्या एका हार्मोनियम वादनाची झलक

