कल्याणच्या केंब्रीया इंटरनॅशनल शाळेचा पुढाकार
आशिया खंडातील सर्वात पहिला हत्तीच्या रूपातील रोबोट (ॲनिमेट्रॉनिक) पाहण्याची संधी कल्याणकरांना मिळणार आहे. शहरातील अग्रमानांकित केंब्रिया इंटरनॅशनल शाळेतर्फे येत्या ५ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात हा एली नामक हत्तीशी पाहता येईल. (Asia’s only animatronic elephant will create awareness about wildlife in Kalyan)
एली हा केवळ एक रोबोट नसून विद्यार्थ्यांमध्ये वन्यप्राण्यांबाबत आस्था आणि प्रेमाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याची निर्मिती करण्यात आली आहे. तर या रोबोटची रचना आणि त्याच्या हालचालीही खऱ्याखुऱ्या हत्तीसारख्या आहेत. विशेष म्हणजे हा बोलणारा आणि समोरच्या व्यक्तीशी संवाद साधणारा हत्ती असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शैक्षणिक जनजागृतीसाठी बनवण्यात आलेला अशा प्रकारचा हा आशिया खंडातील हा सर्वात पहिला रोबोट असल्याची माहिती केंब्रिया शाळेचे प्रमूख आणि सुप्रसिद्ध शिक्षण अभ्यासक बिपिन पोटे यांनी दिली. तसेच या कार्यक्रमातून जमा होणारा सर्व निधी ॲनिमल वेल्फेअर फंडामध्ये दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
येत्या ५ ऑगस्टला सकाळी ११.३० वाजल्यापासून केंब्रिया शाळेमध्ये या अनोख्या हत्तीला पाहण्याची आणि त्याच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम २ ते ५ अशा वयाच्या मुलांसाठी आयोजित करण्यात आला असून त्यासाठी नाममात्र प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे.
रजिस्ट्रेशनसाठी संपर्क : 9833613947 किंवा
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfqyvJetl6j6SXrCNvcUYkXW1rQ6fditVpNTVRI6ShjGgHsDg/viewform या लिंकवर जाऊनही तुम्ही बुकिंग करू शकता.