एखाद्या गोष्टीचं व्यसन (addiction) जडतं म्हणजे नेमकं काय होतं, याचं उत्तर कोणाकडेच नाही. एखादी व्यक्ती सतत दारु पिते, ड्रुग्स घेते, धूम्रपान करते म्हणजे ती व्यसनी आहे, असा सर्वसाधारण विचार प्रचलित आहे. यामुळे त्या व्यक्तीकडे बघण्याचा कुटुंबाचा व समाजाचा दृष्टिकोन बदलतो. व्यसन या शब्दाबद्दल अनेक गैरसमज असतात.
‘व्यसन’ हा एक आजार (addiction is a disease) असून व्यसनमुक्तीसाठी डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार सर्वत्र उपलब्ध आहेत. आजकाल व्यसनमुक्तीसाठी (for addiction relief) बऱ्याच शहरांतून स्व-मदत आधारगट कार्यरत आहेत. कल्याणजवळ गोवेली, टिटवाळा येथे दिशा सामाजिक सेवा संस्था गेली अनेक वर्षे व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. दिशा सामाजिक सेवा संस्था या नावातच व्यसनामुळे दिशाहीन झालेल्या लोकांना योग्य दिशा दाखवणे हेच दिशा चे स्वप्न आहे. योग्य मार्गदर्शन, जाणीवजागृती, उपचार आणि पुनर्वसन हेच स्वप्न साकार करण्यासाठी सामाजिक कार्यात उचललेलं हे पाऊल आहे. व्यसन हा एक मानसिक आजार असल्यामुळे त्याला मानसिक शुद्धी करावी लागते. अशातच समाजाने नाकारलेल्या व्यसनामुळे आयुष्य हरवून बसलेल्या व्यक्तींना आधार देण्यासाठी त्यांना योग्य मार्ग मिळवून देण्यासाठी दिशा सामाजिक सेवा संस्था हा एक उत्तम पर्याय आहे. व्यसनमुक्त राष्ट्र निर्माण करणे हेच दिशाचे स्वप्न आहे.
दिशा सामाजिक सेवा संस्थेविषयी थोडक्यात:
दिशा सामाजिक सेवा संस्थाची स्थापना २०११ मध्ये झाली आणि धर्मादाय आयुक्त अधिनियम १८६०अंतर्गत २०१२ मध्ये नोंदणीकृत झाली. प्रथमतः: ही संस्था कल्याण येथे सुरू झाली. दिशा सामाजिक सेवा संस्थेची स्थापना श्री. राजेंद्र कुऱ्हाडे यांनी केली आहे. साधने आणि संधी उपलब्ध नसल्यामुळे असुरक्षिततेत जगणाऱ्या सामान्य माणसाचे जीवनमान सुधारणे ही दिशा सामाजिक सेवा संस्थाची संकल्पना होती. हे भारतातील मद्यविकार (दारू व्यसन – alcoholism), मादक पदार्थांचे सेवन (Drug abuse) आणि मानसिक विकारांवरील (mental disorders) उपचार सुविधा केंद्र आहे. हे भारतातील प्रथमच अनेक सायकोथेरपी कार्यक्रम असलेले एकमेव उपचार केंद्र आहे. श्री. राजेंद्र कुऱ्हाडे यांनी उपचार मॉडेल विकसित करण्यासाठी एक विकसित दृष्टीकोन अवलंबण्याचे ठरवले. ह्या व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनाधीन व्यक्तींसाठी विविध उपक्रम राबवले जातात. (Various activities are conducted for the addicts in this de-addiction center).
निरनिराळ्या सत्रांमधून (sessions) संस्थेत दाखल झालेल्या व्यसनाधीन व्यक्तींमध्ये सामाजिक, कौटुंबिक जागरूकता (awareness about family and society) निर्माण केली जाते. रोल प्ले थेरपी (confrontations) सारख्या थेरपीमधून स्वतःमधील व दुसऱ्या व्यक्तींमधील उणीवा दाखवून त्यावर कसे काम करावे, आपल्या स्वभावातील दोष काय आहेत व ते कसे काढून टाकावेत ह्यासाठी उत्तम मार्गदर्शन केले जाते.
व्यसनातून मुक्त होणाऱ्या शरीराला संतुलित आहाराची (balanced diet) गरज असते. येथील जेवण पौष्टिक, चवदार (Nutritious & tasty) आणि अतिशय स्वच्छतेने तयार केलेले असते. पदार्थांचे पौष्टिक मूल्य लक्षात घेऊन सर्व जेवण ताजे तयार केले जाते. पौष्टिक मूल्य अबाधित ठेवण्यासाठी संस्थेत इनहाऊस पिठाची गिरणी (Inhouse flour mill) आहे. इथे बरे झालेल्या रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संतुलित कार्बोहायड्रेट्ससह उच्च प्रथिने, कमी चरबीयुक्त संतुलित आहार दिला जातो. जंक फूड, स्ट्रीट फूड इत्यादी अनारोग्यकारक पदार्थ टाळले जातात. मधुमेह (Diabetes)झालेल्या व्यक्तींची येथे विशेष काळजी घेतली जाते. त्यांच्यासाठी वेगळा आहार दिला जातो. (People suffering from diabetes are specially cared here. A separate diet is provided for them).
व्यसनाधीन व्यक्ती ही शारीरिक व मानसिक दृष्ट्या खचलेली असते. बऱ्याचदा त्यांच्या शारीरिक हालचालीदेखील मंदावलेल्या असतात. त्यांनी कार्यरत राहणे खूप गरजेचे असते. त्यासाठी त्यांच्याकडून रोज योगआणि ध्यान (Yoga and Meditation) करुवून घेतले जाते. ज्यातून त्यांना एक शारीरिक व मानसिक उभारी मिळते. तसेच व्यायामासाठी येथे व्यायामशाळादेखील आहे. (gym for exercise)
दिशा सामाजिक सेवा संस्थेत सर्व सण (festivals) अत्यंत उत्साहात साजरे केले जातात. होळी, गुढीपाडवा, गणेशोत्सव, दिवाळी इत्यादी सणाच्या उत्सवाचे आयोजन केले जाते. तसेच येथे दाखल असेलेल्या व्यक्तींचे वाढदिवसही (birthdays) मोठ्या दिमाखात साजरे केले जातात. संस्थेत दाखल असलेल्या व्यक्तींना घरची उणीव भासू दिली जात नाही.
संस्थेत २४ तास डॉक्टर्स (Doctors 24/7) कार्यरत असतात. एखाद्या व्यक्तीस काही त्रास होऊ लागला तर त्याच्यावर तत्काळ उपचार केले जातात. तसेच संस्थेत वेळोवेळी आरोग्य शिबिरेही (Health camps) भरावली जातात.
संस्थेत दाखल झालेल्या व्यक्तींच्या मनोरंजनासाठी (Entertainment) कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी, ल्युडो सारखे इनडोअर गेम्स (Indoor Games) आहेत. वाचनासाठी विविध विषयांवरची पुस्तके, कादंबऱ्या आणि मासिके आहेत. तसेच दर शनिवारी आणि रविवारी चित्रपट देखील दाखवले जातात. मनोरंजनच्या सत्रामध्ये (Entertainment session) मध्ये गाणी, नृत्य, मिमिक्री सादर केली जाते. तसेच इतर काही सत्रामध्ये मध्ये कलागुणांना वाव दिला जातो.
तसेच, संस्थेच्या आवारात श्री दत्तगुरूंचे मंदिर आहे. तेथे रोज नियमितपणे सकाळी व संध्याकाळी आरती केली जाते. आरती झाल्यावर प्रसाद सर्वाना वाटण्यात येतो.
माणसातील माणूसपणा आणि आशावाद जागवणे, समाजाने नाकारलेल्या व्यसनी, मनोरुग्णांना परत माणसात आणणे आणि आपल्या पायांवर उभे करणे हे सामाजिक कार्य दिशा सामाजिक सेवा संस्था, मा. श्री. राजेंद्र कुऱ्हाडे यांचा अध्यक्षतेखाली गेली १२ वर्षे उकृष्टपणे करीत आहे.
“आम्ही ज्या समुदायांमध्ये उपस्थित आहोत त्यांचे आम्ही सामाजिकदृष्ट्या जबाबदार सदस्य आहोत आणि सामाजिक जागरूकता निर्माण करून समाज अमली पदार्थमुक्त व्हावा यासाठी कार्य करावे हा आमचा मानस आहे.” असे संस्थेचे संचालक श्री. राजेंद्र कुऱ्हाडे सांगतात.
दिशा सामाजिक सेवा संस्थेचे संचालक श्री. राजेंद्र कुऱ्हाडे शालेय विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना (Director of Disha Samajik Seva Sanstha, Mr. Rajendra Kurhade speaking in front of school students)
दिनांक: २५ जून २०२३ रोजी सकाळ ह्या न्युज पेपर मध्ये आलेली बातमी
—————————————————————————————————————————–
दिशा सामाजिक सेवा संस्थेच्या कार्यालयाचा पत्ता:
शॉप क्रमांक 24, पहिला मजला, सर्वोदय मॉल,
एपीएमसी मार्केट जवळ, कल्याण पश्चिम – ४२१ ३०१.
संपर्क क्रमांक: +91-88503 64876 । +91-8308125153
दिशा सामाजिक सेवा संस्थेच्या केंद्राचा पत्ता:
सर्व्हे क्रमांक ३६/अ, अंकार रोड, टिटवाळा फाटा, गोवेली,
कल्याण – मुरबाड रोड, तालुका – कल्याण, जिल्हा – ठाणे ४२१ ३०१.
ई-मेल: dishasamajiksevasanstha@gmail.com
वेबसाईट: https://www.dishacares.com/