एकंदरितच पोलिसांमधे ताणतणावाचं तसेच चिंता,नैराश्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे,त्यामुळे संदर्भात जागृतीची खूप आवश्यकता आहे. याचसाठी दिनांक २१ ऑगस्ट २०२३ रोजी रोटरी क्लब सनसिटीचे अध्यक्ष अलंकार तायशेट्ये व नाना साठे प्रतिष्ठानचे कौस्तुभ साठे यांनी पुढाकार घेऊन, एसीपी श्री मंदार धर्माधिकारीसाहेब व वरिष्ठ निरीक्षक श्री गिते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीतल्या वाहतूक पोलिसांसाठी, जे दिवसभर ध्वनी व वायू प्रदूषणाला व प्रचंड रहदारीला तोंड देत काम करतात,त्यांच्या “तणाव नियोजन” या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये ह्यांचे उपस्थितांशी संवाद साधत भाषण झाले व त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली. शेवटी त्या सर्वांकडून स्नायू शिथिलीकरणाचे प्रात्यक्षिकही करून घेतले.