आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली. दिनांक ०३ जुलै २०२३ रोजी देशभरात गुरुपौर्णिमा साजरी केली गेली.
गुरू म्हणजे कोण ? आणि त्याची महती:
‘गु’ ह्या शब्दाचा अर्थ आहे अंध:कार व ‘रु’ चा अर्थ त्या अंध:काराला पुसून टाकणारा = प्रकाश! असा ‘गुरूचा’ अर्थ अभिप्रेत आहे. त्याचप्रमाणे शिष्यात असलेला अंध:कार दूर करणारा व त्याला ज्ञान देणारा म्हणजेच प्रकाश देणारा तो गुरू होय ! त्यालाच खर्या अर्थाने गुरू म्हणावा. आई वडील हे पहिले गुरु. आपल्याला नाव ओळख संस्कार देतात. दुसरा गुरु जो विद्या देतो.तो वाच्याला लिहायला शिकवतो.जेणेकरून आपण सुद्नया होतो. खरा गुरु जो आपल्याला जगण्याला अर्थ आणि दिशा देतो.
दिशा सामाजिक सेवा संस्थेत दिनांक ०३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी झाली. संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र कुऱ्हाडे तसेच संस्थेमधील स्टाफनी गुरुची महती सांगितली व गुरुपौर्णिमेचे महत्व समजावून सांगितले.
हे ही वाचा: दिशा सामाजिक सेवा संस्था – एक पाऊल व्यसनमुक्तीकडे
दिशा सामाजिक सेवा संस्थेविषयी थोडक्यात:
दिशा सामाजिक सेवा संस्थाची स्थापना २०११ मध्ये झाली आणि धर्मादाय आयुक्त अधिनियम १८६०अंतर्गत २०१२ मध्ये नोंदणीकृत झाली. प्रथमतः: ही संस्था कल्याण येथे सुरू झाली. दिशा सामाजिक सेवा संस्थेची स्थापना श्री. राजेंद्र कुऱ्हाडे यांनी केली आहे. साधने आणि संधी उपलब्ध नसल्यामुळे असुरक्षिततेत जगणाऱ्या सामान्य माणसाचे जीवनमान सुधारणे ही दिशा सामाजिक सेवा संस्थाची संकल्पना होती. हे भारतातील मद्यविकार (दारू व्यसन – alcoholism), मादक पदार्थांचे सेवन (Drug abuse) आणि मानसिक विकारांवरील (mental disorders) उपचार सुविधा केंद्र आहे. हे भारतातील प्रथमच अनेक सायकोथेरपी कार्यक्रम असलेले एकमेव उपचार केंद्र आहे. श्री. राजेंद्र कुऱ्हाडे यांनी उपचार मॉडेल विकसित करण्यासाठी एक विकसित दृष्टीकोन अवलंबण्याचे ठरवले. ह्या व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनाधीन व्यक्तींसाठी विविध उपक्रम राबवले जातात. (Various activities are conducted for the addicts in this de-addiction center).
हे ही वाचा: दिशा सामाजिक सेवा संस्था येथे कॉम्प्यूटराइज्ड पद्धतीने व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन