सामाजिक कार्यकर्ता म्हणजे काय?
सामाजिक कार्यकर्ता तो असतो जो लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यात आणि त्यांचा सामना करण्यास मदत करतो. सामाजिक कार्यकर्ता समाजातील लोकांचे कल्याण करणे, त्यांच्या मूलभूत आणि जटिल गरज पूर्ण करणे आणि लोकांना एक चांगले जीवन जगण्यास मदत करण्याचे काम निर्हेतुकपणे करत असतो.
तर आज आपण अश्याच एका सच्च्या कार्यकर्त्याला भेटत आहोत. अश्वमेध प्रतिष्ठानचे संचालक श्री. अविनाश हरड ह्यांना.
श्री. अविनाश हरड ह्यांचा जन्म महाराष्ट्रातील ‘तलासरी’ येथे ३ जून १९८२ साली झाला. शालेय शिक्षणानंतर त्यांनी बॉ. कॉम. (B, Com.) केले व त्यानंतर त्यांनी इंडोलॉजी मध्ये एम. ए. केले (M. A. in Indology). सध्या ते एल. एल. बी. करत आहेत. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. त्यांची ‘अश्वमेध प्रतिष्ठान’ नावाची मुरबाड तालुक्यातील ‘मासले – बेलपाडा’ येथे एक सामाजिक संस्था आहे. त्यांच्या अश्वमेध प्रतिष्ठान विषयी आपण माहिती करून घेऊ.
सन २००२ मध्ये २० महाविद्यालयीन तरूणांनी एकत्र येऊन या संस्थेची सुरूवात केली. प्रारंभीचा उत्साह वृक्षलागवड, दुर्ग भ्रमण व दुर्गस्वच्छता एवढ्यापुरताच मर्यादित होता. याच दरम्यान २००५ मधील महापुरात रायते गावाची दुर्दशा झाली. संपूर्ण गाव पूरग्रस्त होता. उल्हास नदीवरील पुलाचा काही भाग वाहून गेल्याने कल्याणशी संपर्क तुटला होता, ३५ घरे वाहून गेली होती. अशा आपतकालीन परिस्थितीत पुरात अडकलेल्या ग्रामस्थ व जनावरांची सुटका, पुरग्रस्त लोकांना अत्यावश्यक्त वस्तुंचे वाटप तसेच पूर ओसरल्यावर ग्रामस्वच्छता अशी विविध कामे संस्थेच्या कार्यकर्त्यानी हिरिरिने केली. केवळ प्रसिद्धीच्या मोहाने केलेल्या रंगीबेरंगी उत्सवांपेक्षा अशा कामांतून निळणारे समाधान व आत्मविश्वास लाखमोलाचे ठरले.
२००५ पासून सिद्धगड या आपातकालीन परिस्थितीत असलेल्या भिमाशंकर अभयारण्यातील वस्तीच्या पुनर्वसन आंदोलनाचे नेतृत्त्व:
भीमाशंकर अभयारण्यात असलेल्या सिद्धगड या छोट्याशा गावावर ओढवलेली आपत्ती तर रायतेवर आलेल्या आपत्तीपेक्षा मोठी होती. सतत कोसळणाऱ्या दरडी व शेतजमीनीला पडलेले मोठमोठे तडे यांमुळे किल्ल्यावर राहणाऱ्या आदिवासींच्या हालांना पारावार उरला नव्हता. या घटनेने ‘अशवमेध’ ला निश्चित ध्येय मिळवून दिले ते किल्ल्याच्या संवर्धनाबरोबरच वस्तीच्या पुनर्वसनाचे. यानंतर अमलात आलेल्या वनहक्क कायद्याची अंमलबजावणी असो की शासनाकडे पुनर्वसनासाठी पाठपुरावा, अश्वमेध प्रतिष्ठानने या प्रक्रियेत यशस्वीपणे गावकऱ्यांचे प्रतिनिधित्व केले.
२०१२ मध्ये ‘सह्यावलोकन’ या उपक्रमाची सुरूवात. या अंतर्गत सह्यादीच्या डोंगर-दऱ्यांतून सायकलभरनंती व विविध पैलूंच्या दस्तावेजीकरणाचा छोटासा प्रयत्न.
स्थानिक उपक्रम :
- नियमित रक्तदान शिबिरे (आतापर्यत २० शिबिरे).
- स्वयंसहाय्यता बचत गटांना मार्गदर्शन.
- ग्रामीण भागात शेतकरीसंघ (नाबार्ड) स्थापनेत पुढाकार.
- माहितीपर कार्यक्रम तसेच स्लाईड शोजचे नियमित आयोजन.
- अवकाश दर्शन शिबिरे.
- चित्रकला, वकृत्व स्पर्धांचे आयोजन.
- सलग तीन वर्षे उल्हास नदी स्वच्छता अभियानाचे आयोजन.
आपातकालीन व्यवस्थापन पथक:
- पथकासाठी आवश्यकत साहित्य गोळा करून सराव सुरू केला,
- जिल्हा नियंत्रण कक्ष, नागरी संरक्षण दल यांच्याकडून प्रशिक्षण मिळविले व त्यांच्या सराव कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला,
- २००६ पासून गणपती विसर्जनामध्ये पोलीसदलाबरोबर मदतगट तैनात.
- २००६ मध्ये गणपती विसर्जनावेळी बुडणाऱ्या चार भाविकांना वाचविल्याबदूदल पोलीस गहासंचालक डॉ. सत्यपाल सिंह व पोलीस अधिक्षक श्रीमती अर्चना त्यागी यांच्या कडून पथकाचा गौरव.
- २००८ मध्ये गणपती विसर्जनावेळी बुडणाऱ्या दोन भाविकांना वाचविल्याबदूदल पोलीस उप-अधिक्षकांकडून पथकाचा गौरव.
- या पथकातर्फे मर्यादित संसाधनांचा वापर करून अभयारण्य व विविध किल्ल्यांवर स्वच्छता शिबिरांचे आयोजन.
- रस्त्यावरील अपघातात मदत तसेच बुडालेल्या व्यक्तिंचे मृतदेह शोधण्यास प्रशासनाला मदत.
- २००९ मध्ये गणपती विसर्जनावेळी बुडणाऱ्या दोन भाविकांना वाचविल्याबदूदल पोलीस उप-अधिक्षकांकडून पथकाचा गौरव.
- २०११ पासून शाळा व कॉलेजांमध्ये आपत्ती निवारण मार्गदर्शन शिबिरे.
वनविभागाच्या मार्गदर्शन व सहकार्याने पशू-पक्ष्यांसाठी मदत केंद्र:
- मानवी वस्त्यांमध्ये सापडलेल्या सापांची मदत व सुटका.
- नागपंचमीला गारूड्यांकडून सर्प हस्तगत करण्यासाठी पोलीस दलाबरोबर सलग तीन वर्षे अभियान.
- जखमी अवस्थेतील प्राणी व पक्ष्यांवर उपचार.
- वन्यजीवांबद्दल प्रेम व आदर वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन.
- ग्रामीण भागात स्थानिक पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन.
- २०११ मध्ये मुंबई येथे अखिल महाराष्टू पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन.
- जखमी प्राणी – पक्ष्यांसाठी ‘संक्रमण सुविधा’ (Transit Facility) लवकरच सुरू होत आहे.
संदर्भ ग्रंथालय:
- शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय सर्वासाठी विनामुल्य ग्रंथालयाची सुरूवात.
- एकूण पुस्तक सख्या ३०००. यापैकी लहानमुलांना आवश्यक अशा संदर्भासाठी उपलब्ध पुस्तके अंदाजे १०००.
- स्थानिक परंपरा, साहित्य, इतिहास, भूगोल, पर्यावरण यासंदर्भातील माहितीचे, पुस्तकांचे व छायाचित्रांचे संकलन.
- ग्रंथालयातर्फे प्रकल्प बनविणे, संदर्भ शोधणे यासाठी स्पर्धांचे आयोजन.
संग्रहालय:
- आपला समृद्ध वारसा जतन व्हावा व त्याचा अभ्यास व्हावा या उद्देशाने पद्मर्षी सदाशिव गोरक्षकर सरांच्या मार्गदर्शनाने ‘उल्हास संग्रहालय व संशोधन’ संस्थेची सुरूवात झाली.
- मुरबाड इतिहास संशोधन मंडळाची सुरूवात.
- सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी ऐतिहासिक वस्तू, दस्तावेज यांचे संकलन.
- विविध चर्चासत्रे, संमेलने, व्याख्याने इ. कार्यक्रमांमध्ये सहभाग.
- छोट्या कार्यकर्त्यांसह नियमितपणे संग्रहालयांना भेटी व चर्चा.
- ग्रामीण भागातील तरूणांसाठी महाराष्ट्रभर संग्रहालय अभ्यासदौरे.
- इतिहास संशोधन व संवर्धन कार्यशाळांचे आयोजन.
- ‘उल्हास संग्रहालय व संशोधन संस्था’ या उपक्रमासाठी कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेतर्फे टिटवाळा येथे जागा देण्यात आली आहे. लवकरच या संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे.
पद्मश्री सदाशिव गोरक्षकर संग्रहालयासंदर्भात मार्गदर्शन करताना
रोपवाटीका:
- लहान मुलांच्या मदतीने दरवर्षी झाडांच्या बिया गोळा करण्याचा व वाटपाचा कार्यक्रम.
- काही दुर्मिळ बियाणांपासून रोपांची निर्मिती.
- कॉलेज, संस्थांना या दुर्मिळ रोपांचे विनामूल्य वितरण.
- दुर्मिळ वनस्पर्तीच्या संवर्धनाचा प्रयत्न.
- किल्ल्यांवर वृक्षारोपण.
लघुपट व माहितीपट निर्मिती:
- २०१३ – गिरीमनित्र संनेलन १२ वे येथे दृकश्राव्य स्पर्धत ‘सह्यावलोकन – भाग १’ या माहितीपटास द्वितीय पारितोषिक.
- २०१४ – माहितीपट ‘समिधा’.
- २०१५ – गिरिमित्र संमेलन १४ वे येथे दृकश्राव्य स्पर्धत ‘सह्यावलोकन – भाग २’ या माहितीपटास तृतीय पारितोषिक.
पर्यावरण संवर्धनात्मक उपक्रम व चळवळी:
- मासले – बेलपाडा भागातील जैवविविधतेने समृद्ध अशा जंगलाला राखीव जंगल (Conservation Reserve) म्हणून घोषित करून अभयारण्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न.
- याच जैवविविधतेने समृद्ध अशा जंगलाची विल्हेवाट रोखण्यासाठी चळवळीची सुरूवात झाली.
वन विभागाबरोबरील उपक्रम:
- दरवर्षी मासले – बेलपाडा भागातील जंगलात लागणारे वणवे रोखण्यासाठी जाळरेषा (Fire Line) घेणे.
- वाहून जाणारे नैसर्गिक पाणी साठवण्यासाठी पावसाळ्या आधी श्रमदानातून वनराई बंधारे बांधणे.
- वनवासींतर्फेच वनवैभव जतन करून वाढविण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमांच्या आयोजनात मोलाचा वाटा.
- ३१ डिसेंबर या वर्षसमाप्तीच्या निमित्ताने वनविभागाच्या हद्दीतील पळू – सोनावळे येथील गणेश गडद या प्राचीन नेण्यांपर्यत जाणारी १५० वर्षे वापरात नसलेली वाटेची स्वच्छता केली.
व्यक्तिमत्व
इतिहास संशोधनात्मक कार्य:
- माळशेज घाटातील ऐतिहासिक लेण्याचा (पहारेकऱ्यांच्या चौक्या) शोध.
- मुरबाड तालुक्यातील पळू गावाजवळील डोंगरांमधील प्राचीन लेण्यांचा शोध.