ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. या लोकबिरादरी प्रकल्पाला आर्थिक मदत होण्यासाठी रोटरी क्लब कल्याण डायमंड आणि पुढाकार घेत ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांच्या सांगितीक कार्यक्रमाचे कल्याणात आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी 22 एप्रिल २०२३ रोजी येथील आचार्य अत्रे नाट्यगृहात ही सांगितीक मैफिल झाली..
गडचिरोलीच्या हेमल कसा येथे पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासीं बांधवांसाठी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातात. यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर कल्याणातील रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड आणि रोटरी डायमंड फाउंडेशनतर्फे निधी उभारणीसाठी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक अरविंद शिंदे यांनी दिली. शनिवारी 22 एप्रिल २०२३ रोजी रात्री साडेआठ वाजता आचार्य अत्रे नाट्यगृहात होणारे या सांगितीक मैफिलीत ज्येष्ठ संगीतकार गायक श्रीधर फडके यांच्यासह अनेक नामांकित गायक आणि कलाकार सहभागी झाले होते.
Source @LNN