कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. यावेळी शहरातील विविध प्रतिष्ठित व्यक्ती, महापालिका अधिकाऱ्यांसह अनेक सामान्य नागरिकही सहभागी झाले होते. बापगाव येथील महाविक्टोरी चॅरिटेबल ट्रस्टचे लाईफलाईन ब्लड सेंटर, डॉ. प्रताप पानसरे आणि डॉ. दिपक वझे यांच्या सहयोगाने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे अग्निशमन मुख्यालयाच्या मोकळ्या जागेत हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या उपक्रमात 60 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. ज्यामध्ये प्रतिष्ठित नागरिक, महापालिका अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी आदींचा समावेश होता. कल्याण डोंबिवली अग्निशमन दलातर्फे पहिल्यांदाच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.